पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख मधील विशालनगर येथे कै. ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठान व यशश्री महिला संस्था तसेच माजी नगरसेविका आरतीताई सुरेश चोंधे व भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संकेत सुरेश चोंधे आयोजित यावर्षीच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाची हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या माजी अध्यक्ष तेजस्विनीताई ढोमसे, फिरंगोजी (तात्या) कामठे, दादाराव देशमुख, नरेंद्र शास्री, दिलीप रिठे, अलका मकवाना या मान्यवरांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करून सुरूवात करण्यात आली.
आजच्या दिवाळी पहाटची सुरेल सुरूवात श्रीगणेशाच्या “जय देवा जय देवा गणपती महान” या गाण्याने श्री तुषार रीठे यांच्या सुमधुर आवाजात करण्यात आली. सुप्रसिद्ध गायक गौरव महाराष्ट्राचा कलर्स मराठी फेम श्री. तुषार रीठे, ज्ञानेश्वर माउली फेम आसावरी गोडबोले व छोट्या बायोची गोष्ट व रेडु चित्रपट फेम अमिता घुगरी यांनी रूणुझुणु रूणुझुणु रे भ्रम्हरा, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे, अच्छा जी मै हारी व ईतर गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश गायकवाड यांनी केले. आजच्या या कार्यक्रमाचा सर्व नागरीकांनी व प्रेक्षकांनी मनसोक्तपणे गाण्यांचा व दिवाळी फराळाचा आनंद घेतला. कार्यक्रमाची सांगता “माऊली माऊली, रूप तुझे” या गाण्याने झाली.
आजच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख शंकरशेठ जगताप, नगरसेवक संदिप अण्णा कस्पटे, सामाजिक कार्यकर्ते रामदासभाऊ कस्पटे, गणेश कस्पटे, नितीन इंगवले व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
“दिवाळी पहाटच्या निमीत्ताने नागरीकांना एक आनंदमयी, संगीतमय सुरवात करून देणे व त्यांची दिवाळी गोड करणे हाच आमचा नेहमीचा प्रयत्न”– आरतीताई चोंधे, माजी नगरसेविका