पिंपरी (Pclive7.com):- कुदळवाडी मध्ये गोवर या संसर्गजन्य आजाराचे संशयित बालक आढळले आहे. त्यानंतर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातील बालरुग्ण कक्षालातील सर्व डॉक्टरांच्या टीमने कुदळवाडी परिसरातील बालकाची पाहणी करुन लसीकरण बाबत जनजागृती केली. तसेच महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
सध्या गोवर या आजाराची लक्षणे असणाऱ्या बालकांचे रक्ताचे नमुने घेतले. तसेच लसीकरण पूर्ण न झालेले बालकांना या आजाराची लागण झाल्याचे उघड झाले आहे. या आजाराची तीव्रता कमी करून त्यांचा फैलाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच ज्या वस्त्यांमध्ये बालकांना लस घेण्यापासून रोखण्यात येते अशा ठिकाणी वस्त्यांमधील मान्यवर व्यक्तींशी बोलून त्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात येईल असेही याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयातील सर्व प्रमुख डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, स्वीकृत सदस्य दिनेश यादव उपस्थित होते.