लोणावळा (Pclive7.com):- लोणावळा परिसरात एका बंगल्यातील जलतरण तलावात बुडून दोन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी घडली. हानियाझैरा मोहम्मददिन सैय्यद असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. याबाबत हानियाझैराचे वडील मोहम्मददिन (वय ३१, रा. डोंबिवली, जि. ठाणे) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सैय्यद कुटुंबीय आणि नातेवाईक लोणावळ्यात पर्यटनासाठी आले होते. लोणावळ्यातील प्रिसली हिल भागात त्यांनी कार्निवल व्हिला बंगला भाडेतत्वावर घेतला होता.

रविवारी सकाळी सैय्यद कुटुंबीय बंगल्यात नाश्ता करत होता. त्या वेळी बंगल्यातील जलतरण तलावाच्या परिसरातून ओरडण्याचा आवाज आला. सय्यद कुटुंबीयांनी जलतरण तलावाच्या दिशेेने धाव घेतली. तेव्हा तलावातील पाण्यात हानियाझैरा पडल्याचे आढळून आले. तिला पाण्यातून बाहेर काढून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. तिच्या वडिलांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मूत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर करत असून चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.





















Join Our Whatsapp Group