पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी पतंग उडवल्या जातात. मांज्या तुटून रस्त्यावर आल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. गंभीर दुखापत झाली आहे. परिणामी, चिनी मांजा विक्रेत्यांवर बंदी घालण्याची मागणी आयुक्त शेखरसिंह यांच्याकडे ह्युमन राईट फोरम यांच्यावतीने करण्यात आली आहे.

१० डिसेंबर रोजी ॲड. उमेश गावकर हे पिंपरी वरुन भोसरीच्या दिशेने जात असताना एच. ए मैदानासामोर सिग्नलसमोर गंभीर दुखापत झाली आहे. असे अपघात शहरात वारंवार घडतात. यास पक्षी देखील बळी पडतात, असे विक्रेते व पतंगप्रेमी या दोघांवर बंदी घालावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group