पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सोशल मिडीया सेलच्या चिटणीस पदी संदिप इंदलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते इंदलकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मिडीया विभागाचे प्रदेश अध्यक्ष आनंद परांजपे सरचिटणीस सुरज चव्हाण, श्रावण पवार आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे चिञा वाघ, संजोग वाघेरे, विलास लांडे, नाना काटे, दत्ता साने, मंगलाताई कदम, मनिषाताई गटकळ यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत सोशल मिडीयाच्या माध्यमातुन पोहचविन्याचे काम मोठ्या जोमात करणार असल्याचे संदिप इंदलकर यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group