चिंचवड (Pclive7.com):- वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकी चोरणारा भामट्या पोलीसांच्या जाळ्यात आला आहे. काळेवाडी येथे पोलिसांनी सापळा रचून या चोराला गजाआड केले आहे. त्याच्याकडून १ लाख ८५ हजारांच्या ४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दादासाहेब ऊर्फ अनिकेत बाळू निकाळजे (वय २६, रा. इंदीरानगर झोपडपट्टी, सुकटा, ता. भुम जि.उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरिक्षक संतोष पाटील हे तपास पथकासह पेट्रोलींग करीत असताना पोलीस शिपाई स्वप्निल लोखंडे यांना खबर मिळाली की, एक व्यक्ती चोरीची दुचाकी विक्रीकरीता काळेवाडी येथील पाचपिर चौक येथे येणार आहे. तात्काळ पोलीसांनी त्या ठिकाणी सापळा रचला असता तेथे एक व्यक्ती दुचाकीवर येवून थांबला. त्याची हालचाल संशयीत वाटल्याने त्यास पोलीस स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवुन नाव व पत्ता विचारला असता त्याने स्वतःचे नाव दादासाहेब ऊर्फ अनिकेत बाळू निकाळजे (वय २६ वर्षे रा. इंदीरानगर झोपडपट्टी, सुकटा, ता. भुम जि.उस्मानाबाद) असे सांगितले.
पोलीसांनी त्याच्याकडील दुचाकी यामाहा एफझेड नं. एमएच. १४. एफझेड.७७०३ च्याबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलीसांनी कसून चौकशी केली असता ती दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यास अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीने आणखी दोन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलीसांनी खाक्या दाखविल्यानंतर आरोपीकडून एकुण १ लाख ८५ हजार रूपयांच्या किंमतीच्या ०४ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. या दुचाकी वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे उघड झाले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडल २ चे डॉ. काकासाहेब डोळे, वाकड विभागाचे सहा. पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, पोलीस निरीक्षक गुन्हे १ चे संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे २ चे रामचंद्र घाडगे, सहायक पोलीस निरिक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरिक्षक सचिन चव्हाण, पोलीस हवालदार अतिश जाधव, पोलीस नाईक प्रशांत गिलबीले, पोलीस शिपाई स्वप्निल लोखंडे, विनायक घार्गे, कतिय खराडे, अजय फल्ले, तात्या शिंदे, भास्कर भारती यांनी मिळून केली आहे.