मुंबई (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या प्रियाताई बेर्डे यांच्यावर भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी विश्वास दाखवुन भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यासंदर्भात भाजपा मध्यवर्ती कार्यालय मुंबई या ठिकाणी प्रियाताई बेर्डे यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी निर्माता तथा उद्योजक वेदांग महाजन, निर्मता अमर गवळी, धनंजय वाठाकर, कलाकार गिरीश परदेशी, लोकेश गुप्ते, केदार सोमन, संतोष बर्डे, माधुरी जोशी, विद्या पोके पाटील आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group