पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या दि.११ एप्रिल व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि. १४ एप्रिल जयंती निमित्त या महापुरुषांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार उपक्रमांतर्गत त्यांच्या जयंती कालावधीत दरवर्षीप्रमाणे यावर्षी विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यासंदर्भात आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अतिरिक्त आयुक्त ३ यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. १३) रोजी दुपारी ३ वा. महापालिकेतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह, तिसरा मजला, मुख्य प्रशासकीय भवन, पिंपरी येथे पूर्वनियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.