पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य कार्यालयातील पाणी पुरवठा विभागात “लाचलुचपत” विभागाची धाड पडली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी धाड टाकली आहे. या धाडीत एक लाख रुपयाची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतला आहे.

ठेकेदाराची फाईल पुढे पास करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी पाणीपुरवठा विभागातील दिलीप आढे नामक लिपिकाने ठेकेदाराकडे केली होती. त्या ठेकेदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील दिलीप आढे नामक लिपिकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)





















Join Our Whatsapp Group