पिंपरी (Pclive7.com):- विधिमंडळाचे कामकाज किती तास झाले आणि त्यामध्ये किती महत्त्वाचे निर्णय झाले, यावरून अधिवेशनाच्या यशाचे मोजमाप केले जाते. त्याअर्थाने यावेळचे अधिवेशन कमालीचे यशस्वी ठरले, असे म्हणावे लागेल.

विधान परिषदेत प्रत्यक्षात १२५ तास वीस मिनिटे तर विधानसभेत प्रत्यक्षात १६५ तास ५० मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज नऊ तास दहा मिनिटे झाले. सदस्यांची सरासरी उपस्थिती ८०.८९ टक्के होती. अधिवेशनात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपये हेक्टरी अनुदान जाहीर करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. लेक लाडकी योजना, राज्याचे नवे आधुनिक महिला धोरण, नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे आदी विषयांबाबत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली. महिलांना एस.टी. बस प्रवासात ५० टक्के सवलतीचा ऐतिहासिक निर्णय याच कालावधीत झाला.
अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला आणि युवा वर्गाच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे.

दोन्ही सभागृहांत मिळून एकूण १७ विधेयके संमत करण्यात आली.
१) वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण विधेयक,
२) मुंबई महानगरपालिका आणि महानगरपालिका (सुधारणा) विधेयक (नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत),
३) महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक (शिक्षेच्या तरतुदीमध्ये बदल करण्याबाबत),
४) महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिक्षण विधेयक,
५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ
६) सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (सुधारणा) विधेयक
७) विद्यापीठांचे कुलगुरू नियुक्ती करण्याच्या व प्र-कुलगुरूंची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती स्थापन करण्यासंदर्भात विधेयक)
८) कामगार कायदे (सुधारणा) विधेयक (शिक्षेच्या तरतुदीमध्ये बदल करण्याबाबत),
९) पंढरपूर मंदिरे (सुधारणा) विधेयक,
१०) विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क नियमन सुधारणा),
११) तंत्रशिक्षण मंडळ (सुधारणा) विधेयक,
१२) गोसेवा आयोग विधेयक,
१३)पोलिस (सुधारणा) विधेयक,
१४) सहकारी संस्था (सुधारणा) व इतर ४ महत्त्वाची विधेयके या अधिवेशनात मंजूर करण्यात आली.
एकूणच अधिवेशनात आवश्यक तिथे संघर्ष झाला. गोंधळही झाला. काही विषयांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमधील संगनमताचे दर्शन घडले. महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचून सत्तेवर आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारला सूर गवसल्याचे अधिवेशनामध्ये पाहावयास मिळाले.
शब्दांकन : –
वेदांग महाजन
भाजपा सांस्कृतिक आघाडी महाराष्ट्र राज्य

























Join Our Whatsapp Group