पिंपरी (Pclive7.com):- विनायक गायकवाड यूथ फाऊंडेशन आयोजित वाकड प्रिमियर लीगमध्ये पुरुषांच्या संघामध्ये वीर मराठी संघाने बाजी मारली. तर दुसरा क्रमांक साठेनगर योद्धा व तिसरा क्रमांक आर एस एच वॉरियर्स यांनी पटकाविला. तर महिला संघामध्ये पहिला क्रमांक वेदांता जेम्स, दुसरा क्रमांक रिदम फ्लायिंग स्वेरल व तिसरा क्रमांक डायनॅस्टी डेअर ड्रीमर्स यांनी पटकाविला. ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये पहिला क्रमांक ७ पी डी, दुसरा क्रमांक दत्तकृपा संघ व तिसरा क्रमांक वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघ यांनी पटकाविला.

विनायक गायकवाड यूथ फाऊंडेशन आयोजित वाकड प्रिमियर लीगच्या ६ व्या पर्वाचा चषक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या वाकड प्रिमियर लीगच्या सहाव्या पर्वामध्ये २५० संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावर्षी महिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.

अत्यंत चुरशीचे सामने, जय-पराजयाची चिंता न करिता खेळाडू वृत्तीने खेळणे, एकमेकांना प्रोत्साहन देणे, महिलांची व ज्येष्ठ नागरिकांची अद्वितीय खेळाडू वृत्ती अन् सर्वात महत्वाचे म्हणजे वाकड प्रीमियर लीग हा मर्यादित कार्यक्रम अथवा संकल्पना नसून एक पारिवारिक भावना आहे, हे यावर्षीचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी सांगितले.

माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या हस्ते विजयी संघाना चषकाचे वितरण करण्यात आले. सोसायटी सभासद मोठ्या संख्येने सामने पाहायला व चषक वितरणासाठी उपस्थित होते.

























Join Our Whatsapp Group