पिंपरी (Pclive7.com):- आयपीएल क्रिकेट सामन्यातील दिल्ली-मुंबई मॅचवर बेटिंग लावणाऱ्या ५ बुकींना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई चिंचवड येथील लिंक रोड येथे मंगळवारी (दि.११) रात्री पावणेनऊच्या सुमारास करण्यात आली.

गोविंद प्रभुदास लालवानी (वय ४५, रा. पिंपरी कॅम्प, पिंपरी), कन्हैयालाल सुगुणुमल हरजानी (वय ६१, रा. पिंपरी कॅम्प, पिंपरी), देवानंद प्रतापराय दरयानी (वय ५१, रा. तानाजीनगर, चिंचवडगाव), रमेश दयाराम मिरानी (वय ६३, रा. पिंपरी), हरेश हनुमंत थटाई (वय ५८, रा. पिंपरी कॅम्प, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक सागर अवसरे यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंगळवारी रात्री दिल्ली विरुद्ध मुंबई असा आयपीएलचा सामना होता. या सामन्यावर आरोपी बेटिंग घेत होते. फोनवर बेटिंग लावली जात होती. लिंक रोड येथे मेट्रोपोलिटन सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये क्रिकेट बेटिंग सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात दोन कॉम्प्युटर, मोबाइल आणि इतर साहित्य असा ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास फौजदार माने करत आहेत.





















Join Our Whatsapp Group