पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड मतदार संघातील विविध नागरी समस्या सोडवाव्यात. तसेच रखडलेले प्रलंबित प्रकल्पांची कामे मार्गी लागतील अशी सूचना आमदार अश्विनी जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना केली. सर्व माजी नगरसेवकांसह पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत आमदार अश्विनी जगताप यांनी आज (दि.२६) आढावा बैठक घेतली.
या बैठकीस चिंचवड मतदारसंघ निवडणूक प्रभारी माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, राजेंद्र गावडे, अंबरनाथ कांबळे, सुरेश भोईर, शशिकांत कदम, सागर अंगोळकर, अभिषेक बारणे, बाळासाहेब ओव्हाळ, संदीप कस्पटे, बाबा त्रिभुवन, हर्षल ढोरे, शेखर ओव्हाळ, संतोष कांबळे, मोरेश्वर शेडगे, राजेंद्र राजापुरे, स्थायी समिती माजी अध्यक्षा ममता विनायक गायकवाड, माजी नगरसेविका संगीता भोंडवे, उषा मुंढे, सविता खुळे, सुनिता तापकीर, मनीषा पवार, नीता पाडाळे, शारदा सोनवणे, निर्मला कुटे, अश्विनी चिंचवडे, आरती चोंधे व महापालिका अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता व खाते प्रमुख उपस्थित होते.
सदर बैठकीत माजी नगरसेवक, नगरसेविका यांच्या प्रभागातील रखडलेली विकास कामे व अडीअडचणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले. यावर आयुक्तांनी लवकरच सर्व प्रलंबित कामे मार्गी लागतील असे आश्वासन दिले.