पिंपरी (Pclive7.com):- प्रीपेड टास्कचे काम देण्याच्या बहाण्याने महिलेची १४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना १४ ते १७ जून या कालावधीत आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने सोमवारी (दि.१९) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सुरुची विषणवाणी, राणा दाणा, दिव्या, लेव्ही दिनेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांना युट्युबचे व्हिडीओ लाइक करण्यास सांगितले. त्यानंतर प्रीपेड टास्कचे काम देऊन त्यातून पैसे मिळतील असे आमिष दाखवले. महिलेकडून प्रीपेड टास्कसाठी १४ लाख ४० हजार ९०३ रुपये घेत फसवणूक करण्यात आली.























Join Our Whatsapp Group