पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंञी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब गरजू व्यक्तींना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. शहरातील विविध भागात हा स्तूत्य उपक्रम शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर यांच्या वतीने राबवण्यात आला.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230713-WA0023-300x150.jpg)
गणेश आहेर यांनी राबविलेल्या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख गोरख पाटील, कष्टकरी कामगार नेते प्रल्हाद कांबळे, मातोश्री सामाजिक संस्थेचे शहराध्यक्ष गणेश पाडुळे, विभाग समन्वयक गोरख नवघणे, विभागप्रमूख बाळासाहेब गायकवाड, विभाग संघटक भरत इंगळे, शाखाप्रमुख अंकुश पवार, अंकुश गायकवाड, शंकर शिंगारे, मारूती म्हस्के उपस्थित होते.