पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डीच्या विकासाचे शिल्पकार दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त सोमवार (दि.३१ जुलै) रोजी आकुर्डी येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे आयोजन झाकिर रमजान शेख यांच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिर, आणि मोफत फ्री बॉडी चेकिंग व मोफत हिमोग्लोबिन तपासणीसह अनीमिया मुक्त भारत अभियान आणि क्षय रोग जनजागृति अभियान अशा आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी नागरिकांनी सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत हॉटेल सिल्वर सेवन, बजाज पेट्रोल पंप मागे आकुर्डी येथे संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी केले आहे.
Tags: आकुर्डीआरोग्य शिबीरइखलास सय्यदजावेद शेखझाकीर रमजान शेखतृतीय पुण्यस्मरणदिवंगत नगरसेवकभव्य रक्तदान शिबिरराष्ट्रवादी काँग्रेस






















Join Our Whatsapp Group