पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन रोडवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामाला सुरुवात झाली आहे.
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांना शिवार चौक ते छत्रपती युवा चौका पर्यंतचा रोडबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यानुसार काल (दि.२८ जुलै) रोजी सततच्या तक्रारीनुसार पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोड संबंधित महापलिकेच्या स्थापत्य प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती.
नाना काटे यांनी या रस्त्यावरील खड्डे त्वरीत कोल्ड मिक्स पद्धतीने बुजविण्यासाठी आदेश दिले होते. त्यानुसार आज कोल्ड मिक्स पद्धतीने खड्डे बुजविण्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना रस्त्यावरून चालणे व वाहने चालविण्यास मदत होणार असल्याचे नाना काटे यांनी म्हटले आहे.