पिंपरी (Pclive7.com):- पुणे मेट्रोची पीसीएमसी ते फुगेवाडी व वनाझ ते गरवारे या मार्गिकेवर मागील वर्षी उदघाटन झाले. दिनांक १/८/२०२३ रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते या दोन्ही मार्गिकांचा विस्तार केला जात आहे. या विस्तारित मार्गांमध्ये फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या मार्गांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होत आहे.

या नवीन मार्गाच्या लोकार्पणामुळे पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गांवर प्रवास करणे शक्य होणार आहे. मेट्रोचे न्यूनतम भाडे १० रुपये असून अधिकतम भाडे ३५ रुपये असणार आहे. पीसीएमसी ते वनाझ असा प्रवास करण्यासाठी ४० मिनिटे लागणार आहेत आणि त्यासाठी ३५ रुपये भाडे लागेल तसेच पीसीएमसी ते रुबी हॉल यासाठी ३० रुपये भाडे असेल. वनाझ ते रुबी हॉल यासाठी ३५ रुपये भाडे असेल.

विद्यार्थ्यांसाठी भाड्यामधे ३०% सवलत असणार आहे. शनिवार रविवार सर्व नागरिकांसाठी ३०% सवलत असणार आहे. तसेच मेट्रो कार्ड धारकांसाठी सरसकट १० % सवलत असणार आहे (मेट्रो कार्ड लवकरच विक्रीस उपलब्ध होणार आहे)
भाडे तक्ता खालील प्रमाणे असणार आहे..

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे ते रुबी हॉल या मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर संध्याकाळी ५:०० वाजेपासून पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट व वनाज ते रुबी हॉल अशी थेट मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरू होईल. सिव्हिल कोर्ट इंटरचेंजचे स्थानकाचा वापर करून पीसीएमसी ते वनाज, पीसीएमसी ते रुबी हॉल असा प्रवास करणे शक्य होईल.
पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट या मार्गवरील मेट्रोच्या सेवेची वारंवारता

मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत रोख, क्रेडिट – डेबिट कार्ड डिजिटल वॉलेट, मेट्रो ॲप द्वारे तिकीट खरेदी करता येईल. तिकीट खिडकी, तिकीट वेंडिंग मशीन, व्हाट्सअप इत्यादी पद्धतीने तिकीट प्राप्त केले जाऊ शकते. पीएमपीएमएल द्वारा फीडर बस सेवेचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. ३ कोचची ट्रेन असून त्यातील एक डब्बा महिलांसाठी राखीव आहे. दिव्यांगासाठी मेट्रो कोच मध्ये विशिष्ट जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मेट्रो स्थानक व मेट्रो कोच मध्ये इमर्जन्सी हेल्प बटन ठेवण्यात आली आहे. त्यामाध्यमातून स्टेशन कंट्रोलरशी थेट संपर्क साधता येतो.






















Join Our Whatsapp Group