पिंपरी (Pclive7.com):- पार्टी वीथ डिफेन्सचा नारा देणार्या पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांची हिंम्मत चक्क एकमेकांची कॉलर पकडण्यापर्यंत गेली. आज पिंपरीत भाजप पदाधिकार्यांची राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. परंतू त्याच्याच पुढे पिंपरीच्या ‘एका’ मुद्द्यावरून एवढी खडाजंगी झाली… गोपीनाथ मुंढे समर्थक माजी अध्यक्ष आणि नितीन गडकरी समर्थक विद्यमान सरचिटणीस आणि महापालिका सत्तारूढ पक्षनेते यांच्या उजवा हात असलेले एकमेकांत भिडले… हे फक्त भिडलेच नाहीत तर एकमेकांची कॉलर पकडल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते.