पिंपरी (Pclive7.com):- थरमॅक्स चौक येथील नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्याजवळ आज (दि.०८) सकाळी शॉक सर्किटमुळे कार ने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत ही कार जळून खाक झाली आहे.
भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी या घटनेची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान कार ने पेट घेताच चालकाने कार मधून बाहेर उडी मारली. त्यामुळे त्याला कुठलीही इजा झाली नाही. परंतु कारमध्ये असलेले लॅपटॉप व इतर सामान संपूर्णतः जळून खाक झाले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी काही क्षणातच ही आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत ही कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.