पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पिपंरी चिचवड शहर (जिल्हा) शहराच्या युवक अध्यक्ष पदी शेखर काटे तर कार्याध्यक्षपदी प्रसाद कोलते, प्रसन्ना डांगे, तुषार ताम्हाणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शेखर काटे व सहकारी प्रसाद कोलते, प्रसन्ना डांगे, तुषार ताम्हाणे यांना निवडीचे पत्र दिले.

पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो अधिकाधिक मजबूत रहावा या दृष्टीकोनातून आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या युवक नेतृत्वांना कार्यकारिणीत सामावून घेण्यात येत आहे. त्याच भूमिकेतून शनिवार (दि.०९) युवक अध्यक्षांसह तीन शहर कार्याध्यक्षांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते तसेच युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला अध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आल्या आहेत.
शेखर काटे, प्रसन्न डांगे, प्रसाद कोलते,तुषार ताम्हाणे हे शहरातील युवा नेतृत्व आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासोबत येणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर सक्षम आणि जनतेमध्ये स्थान असणाऱ्या नेतृत्वास राष्ट्रवादीकडून कार्यकारणीमध्ये स्थान देण्यात येत आहे. त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडावी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचवावी अशा सुचना देखील नाना काटे यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना केली.






















Join Our Whatsapp Group