पिंपरी (Pclive7.com):- कै.चंद्रकांत साठे सरांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली मर्यादित षटकांची टी -ट्वेंटी,स्पर्धा “सिल्वर क्रिकेट अकॅडमी” व “परंदवाल क्रिकेट ॲकॅडमी” मैदानावर येथे (दि.१७) मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच विनीत कुलकर्णी यांच्या हस्ते “सिल्वर क्रिकेट अकॅडमी” येथे झाले.

या प्रसंगी विनीत कुलकर्णी म्हणाले की, कै.चंद्रकांत साठे सरांसारख्या उत्कृष्ट पंचांच्या नावाने ही स्पर्धा सुरू होत आहे. याचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करून स्पर्धा यशस्वी करावी. तसेच या नाविन्यपूर्ण स्पर्धेच्या मागील हेतू स्पष्ट करताना पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, या प्रसंगी म्हणाले की, ही स्पर्धा पिंपरी चिंचवड शहरामध्ये क्रिकेटचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून व येथील खेळाडूंना आपले क्रीडा नैपुण्य दाखवण्यास मिळावे यासाठी एक उत्कृष्ट संधी आहे. या संधीचा लाभ सर्व खेळाडूंनी घ्यावा. या प्रसंगी प्रास्ताविक पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजय शिंदे यांनी केले व पाहुण्यांची ओळख सचिव राजू कोतवाल यांनी करून दिली. याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी नरेंद्र कदम,मृदुला महाजन, प्रदीप वाघ उपस्थित होते.
दरम्यान परंदवाल क्रिकेट अकॅडमीचे मैदान, देहू येथे स्पर्धेचे उद्घाटन विजयसिंह मोहिते यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुकेश गुजराथी, वसंतभाऊ कोकणे, हर्ष नायर हे उपस्थित होते. प्रास्ताविक मुकेश गुजराथी यांनी केले.
पहिल्या दिवशी झालेले सामने..
सकाळच्या सत्रात पहिला सामना सिल्वर अकॅडमी येथे अजिंक्य क्रिकेट क्लब विरुद्ध एसएनबीपी क्लब यांच्यामध्ये झाला. अजिंक्य क्लब २० षटकांमध्ये १८० धावा ६ गडी बाद.आदित्य भोसले २८,मनोज कदम ३२,जगदीश जाधव यांनी ९ षटकारांसह ७७ धावा केल्या.सुशील जाधव २६/३.एसएनबीपी क्लब २० षटकांमध्ये १७७ धावा ६ बाद.शुभम तिवारी ७८,सुशील जाधव ३१,केतन गायकवाड ३३.प्रशांत पोळ २४/२,जगदीश जाधव २७/१.अजिंक्य क्लबने हा सामना तीन धावांनी जिंकला.
दुपारच्या सत्रात दुसरा सामना बारणे क्रिकेट अकॅडमी विरुद्ध महेंद्र वारियर्स असा झाला.बारणे क्रिकेट अकॅडमी वीस षटकांमध्ये २३७ धावा ८ बाद.हर्षल हडके ९६,प्रतिक खोललंम२०,ऋषिकेश बारणे १९,श्रेयस जाधव २९.महेंद्र वारियर्स १८.४ षटकांमध्ये सर्व बाद ११२ धावा. अक्षय ताम्हाणे २३, रमेश बचाटे ४५, गौरव जोशी ३१/३ ऋषिकेश बारणे ३५/३, जीत भारती १४/२,आर्यन विश्वकर्मा १५/२. बारणे क्रिकेट अकॅडमीने हा सामना १२५ धावांनी जिंकला
सकाळच्या पहिल्या सत्रात परंदवाल क्रिकेट अकॅडमी येथे पहिला सामना किरण क्रिकेट क्लब विरुद्ध रोहित क्रिकेट क्लब असा झाला.किरण क्रिकेट क्लब ९ बाद १३९ धावा.ओम शिरभाते ३७,आदित्य वाघमारे ३५/ २,अलेक्स स्वामी २६/२.रोहित क्लब १३ॱ२ षटकांमध्ये सर्व बाद ५७ धावा.श्लोक पांड्या ५/४,पार्थ मिश्रा १६/३.किरण अकॅडमीने हा सामना ८२ धावांमध्ये जिंकला.
दुपारच्या सत्रामध्ये परंदवाल क्रिकेट अकॅडमी विरुद्ध चोंधे पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन असा सामना झाला.परंदवाल क्रिकेट अकॅडमी १४ षटकांमध्ये सर्व बाद ८२ धावा.प्रफुल्ल कानडे २९.रोहित थोरात १०/३,आयुष भापकर २५/२,ओम सपकाळ १०/२,पराग सोनी २४/२,चोंधे पाटील फाउंडेशन ८२ धावा ८ बाद.अक्षत शाह १९,कुणाल मदले १७,अद्वैत वामन १९/४.हा सामना अनिर्णित झाल्यामुळे सुपर ओव्हर मध्ये चोंधे पाटील स्पोर्ट्स फाउंडेशनने हा सामना ३ धावांनी जिंकला.






















Join Our Whatsapp Group