पिंपरी (Pclive7.com):- गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले. या विजयाचा पिंपरी चिंचवड शहर भाजपच्यावतीने मोठा जल्लोष करण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पदाधिकार्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. तर महिला पदाधिकार्यांनी फुगडी खेळून विजयोत्सव साजरा केला.
यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महिला अध्यक्षा शैलजा मोळक, प्रदेश सदस्या उमा खापरे, सरचिटणीस प्रमोद निसळ, अमोल थोरात, नगरसेवक शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, विलास मडिगेरी, माऊली थोरात, शैलेश मोरे, उत्तम केंदळे, नामदेव ढाके, सागर गवळी, नगरसेविका कमल घोलप तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.