पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये मराठा आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काही वेळात शहरात होणार दाखल होणार आहेत. ते शहरात येण्याआधीच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राजकीय नेत्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पिंपरी चिंचवड शहरात येण्यास बंदी घातली आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. काही वेळातच ते महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयास भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध केला आहे.
दरम्यान विरोधी पक्षनेते आंबदास दानवे यांना विरोध करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतल ताब्यात घेतले आहे. सध्या वायसीएम रुग्णालय परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून मराठा आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group