![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231014-WA0012-300x150.jpg)
विद्यार्थी आणि पालकांनो ही बाब लक्षात असू द्या!
या कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दिनांक 2 नोव्हेंबर 2023 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त जाहिरातीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी अशी सूचनाही करण्यात आली आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिध्द झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन देखील महाराष्ट्र शिक्षण मंडळाने केले आहे.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. या संभाव्य वेळापत्रकावर मंडळाने हरकती आणि सूचना मागवली होती. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने, विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2024 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर या वेळापत्रकाला अंतिम स्वरुप दिले जात आहे.