पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील श्री व्यंकटेश्वरा ट्रस्टचे संस्थापक संतोष नायकवडी यांनी नुकतीच श्री व्यंकटेश्वरा तिरुपती बालाजी दर्शनाची १०० वी मोफत दर्शन यात्रा पूर्ण केली. आजपर्यंत अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला आहे.
गेल्या २५ वर्षांपासून संतोष नायकवडी हे विनामूल्य तिरुपती बालाजी देवदर्शन सेवा करीत आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, तिरुपती बालाजीच्या पहिल्या फेरीच्या वेळी आलेल्या संकटामधून बालाजीमुळेच सुटका झाली अशी माझी श्रद्धा आहे. त्यामुळेच त्या दिवसांपासून आजपर्यंत अनेक भाविकांसाठी मी तिरुपती बालाजी दर्शनाची मोफत यात्रा घडवून आणतो. या कार्यासाठी आई शकुंतला नायकवडी, वडील सुभाष नायकवडी, भाऊ संजय नायकवडी, पत्नी पूजा नायकवडी व मित्रांचे सहकार्य मिळते असे त्यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group