पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना मावळ लोकसभा संघटकपदी संजोग वाघेरे पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचे नियुक्तीपत्र प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

संजोग वाघेरे पाटील यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे. महापालिका निवडणुकीतही त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा फायदा पक्षाला होणार आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वाघेरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेत मावळ लोकसभा संघटक पदी नियुक्ती करत त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे.























Join Our Whatsapp Group