पिंपरी (Pclive7.com):- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार २० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण या शिकवणीनुसार हिंदुत्वांच्या प्रखर विचारांनी प्रेरीत होवुन, मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरीत होत. पिंपरी चिंचवड शहर संघटक निलेश हाके यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी थेरगाव येथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी प्रवेश केलेल्यांना खासदार बारणे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्यात दीपक शेरखाने (विभाग प्रमुख) फुगेवाडी -दापोडी -कासारवाडी, अजय कदम (उपविभाग प्रमुख ), मनोज काची (उपविभाग प्रमुख), अमर अडसूळे (शाखाप्रमुख), सचिन कोष्टी (शाखाप्रमुख), महेंद्र पोळके (शाखा प्रमुख), अविनाश जाधव (शाखाप्रमुख), गणेश काटे (शाखा प्रमुख) यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळेस शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी विधानसभा प्रमुख निखिल येवले उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group