पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संजय वाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि.१७ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
बुधवार दि.१७ रोजी इंद्रायणीनगर मिनी मार्केट येथे सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीराचे उद्घाटन माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते होणार आहे. ९.३० वाजता बिल्डींग नं.६०/४ से.नं.२ येथे माता पिता संघ कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर १० वाजता बालाजीनगर टेल्कोरोड येथे आरोग्य शिबीर, १०.१५ वाजता बालाजीनगर येथील अंगणवाडी-बालवाडी मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, तसेच १०.३० वाजता खंडेवस्ती येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, ११ वाजता इंद्रायणीनगर येथील अदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह येथील विद्यार्थ्यांना फळवाटप, दुपारी १२ वाजता भोसरी पांजरपोळ येथील पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट अंधशाळा येथे अन्नदान तसेच १२.३० वाजता यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा येथे अन्नदान करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दीड वाजता इंद्रायणीनगर गणेशमंदीर येथे महिला बचत गटाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा महाकलाविष्काराचा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रम इंद्रायणीनगर येथील से.नं.२ मिनी मार्केट येथे होईल. तसेच इंद्रायणीनगर येथील नगरसेवक संजय वाबळे यांचे कार्यालय येथे दि.१६ ते दि.२० जानेवारी दरम्यान मराठी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याठिकाणी पुस्तकांच्या विक्रीची व्यवस्था करण्यात आलीय. बहुजन हिताय सुखाय सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने हे प्रदर्शन भरविण्यात आले असल्याची माहिती संजय वाबळे मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.





















Join Our Whatsapp Group