पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी- चिंचवडमधील टेल्को कंपनीच्या समोरील रस्त्यावर सुरू असलेल्या एका स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धावत्या कारच्या टपावर बसून एक तरुण स्टंटबाजी करताना व्हिडिओमध्ये दिसतो आहे. या तरुणाचा शोध वाहतूक पोलीस घेत असून त्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जीवावर बेतेल अशा पद्धतीने धावत्या कारच्या टपावर बसून तरुण स्टंटबाजी करतो आहे. हा व्हिडीओ पिंपरी-चिंचवड शहरातील असून तरुणावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे. अत्यंत बिनधास्तपणे हा तरुण कारच्या टपावर बसलेला दिसतो. त्याला कुठलीच भीती नाही. अस व्हिडिओतुन स्पष्ट होत आहे. या व्हिडिओच्या आधारे तरुणाचा शोध घेऊन त्यावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी माहिती दिली आहे, अशा पद्धतीने कोणीही स्टंटबाजी करू नये असं आवाहन ही पोलिसांनी केलं आहे.
























Join Our Whatsapp Group