मावळ (Pclive7.com):- इंदुरी ता. मावळ येथील कै गोविंद सदाशिव मिडे यांचे निधनानंतर होणाऱ्या दशक्रियेच्या व तेराव्याच्या विधीच्या होणाऱ्या खर्च वाचवत त्यातून लोकपयोगी वस्तू व वृक्षदानाच्या माध्यमातून मिडे यांच्या पत्नी व मुलींच्या हातून श्रद्धांजली देण्यात आली.
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या कार्याची व केलेल्या समाजाप्रती ऋण व्यक्त करून व त्यांची श्रद्धांजली मधून भावना व्यक्त करण्याची प्रथा आहे. या प्रथेला समाजपयोगी कार्यातून व सामाजिक बांधिलकी जपत इंदोरी (मावळ) येथील कै गोविंद सदाशिव मिडे यांचे परिवाराने त्यांच्या निधनानंतर दशक्रियेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा बडेजाव नकरता त्यांची आठवण सतत येत राहो व त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे नातु उद्योजक पै. यश उर्फ सनी भाऊसाहेब राक्षे यांच्या वतीने इंदोरी येथील वैकुंठधाम स्मशानभूमी साठी दशक्रिया व इतर विधीसाठी माईक साऊंड सिस्टीम कायमस्वरूपी, मोफत देण्यात आली.
तसेच पाच पिंपळ, पाच वड व दोन कडूनिंब या झाडांचे वृक्षारोपण करून त्याची संगोपन करण्याची जबाबदारी मिडे परिवाराने घेत एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवून त्यासोबत तेराव्याचाही कार्यक्रम व खर्च मोठ्या प्रमाणात न करता त्या खर्चातून केशर आंब्याची झाडांचे मोफत वाटप वृक्ष दान करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका बाबुराव चांदेरे, हभप महादेव महाराज भुजबळ, हभप संगिता येनपुरे, हभप तुकाराम जांभूळकर, हभप दिलीप महाराज खेंगरे , हभप अंजली गुरव, सभापती विंठ्ठलराव शिंदे, पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे , सरपंच संदिप काशिद, हणुमंत भालेकर, संचालक सुभाष राक्षे मुरलीधर ठाकर, विजय भिसे, प्रकाश खराबी, मनमंदिरा व गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा संपर्कप्रमुख भाऊसाहेब राक्षे मिडे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई मिडे, मुली आशा, वंदना, सुनंदा, सुशिला, दिपाली, रूपाली व परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group