पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील साई पर्ल सोसायटीतर्फे घेण्यात आलेली बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. लहानांपासून मोठ्यांपर्यत १६० खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. कुलदीप कुलकर्णी, अरुण नक्का, सुमीत पवनीकर, अक्षय येतीवार, मानसी रत्नपारखी आणि चेतन पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
लिप बॅडमिंटन कोर्टवर सहा गटात झालेल्या या स्पर्धेत दहा वर्षांखालील गटात आध्या बी. आणि सुरभि डी. (विजेत्या) आयुष के. आणि विहान (उपविजेते), दहा वर्षांवरील गटात पूनीत ए. आणि प्रथमेश जी. (विजेते) सोहम सोनी आणि मेहेक आर. (उपविजेता), २५ वर्षांवरील पुरुष गटात माधव शाह आणि हर्षल देशमुख (विजेते) अरुण नक्का आणि रितेश अगरवाल (उपविजेते), २५ वर्षांवरील महिला गट धनश्री छतरान आणि रिचा सिंग (विजेते) वर्षा सिनारे आणि अनिता पवार (उपविजेते) मिक्स डबल गटात हर्षल गिरीपुंजे आणि सुषमा गिरीपुंजे (विजेते) अरुण नक्का आणि रिचा सिंग (उपविजेते ), ४५ वर्षांवरील गटात समीर देशपांडे आणि सचिन आल्हाट (विजेते) अनिल कुलकर्णी आणि विलास भाले (उपविजेते) या स्पर्धकांनी यश संपादन केले. सर्व यशस्वी खेळाडुंना ट्राफि देऊन सन्मानित करण्यात आले.