पिंपरी (Pclive7.com):- विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी बनवतीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने एका तरुणाला अटक केली आहे. अक्षय कैलास रोकडे (वय – २७, रा. ए २५ सद्गुरु कॉलनी नं.२ वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि.२९ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वाकड येथील हॉटेल आहार प्युअर व्हेज, डिकॅथलॉनच्या मागील रस्त्यावर एक तरुण संशयितरित्या आढळला. गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस हवालदार तुषार शेटे यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे ५२ हजार रुपये किमतीचे एक पिस्टल व दोन जिवंत काडतूसे विनापरवाना बेकायदेशीर रित्या बाळगल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय रोकडे याला अटक केली असून पुढील कारवाई वाकड पोलीस करत आहेत.

























Join Our Whatsapp Group