पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी बिलात तिप्पट दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज महापालिका मुख्यालयात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रविंद्र दुधेकर यांच्या कार्यालया समोर ठिय्या मांडून प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर दुधेकर यांना ही दरवाढ रद्द करावी अशा मागणीचे पत्र देण्यात आले. ही दरवाढ रद्द न केल्यास मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला.
मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राजू सावळे, अंकुश तापकीर, रूपेश पेटकर, विष्णू चावरिया, सीमा बेलापूरकर, हेमंत डांगे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group