पिंपरी (Pclive7.com):- राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. ७ फेब्रुवारी) रोजी पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात सामुदायिक अभिषेक करून या उपक्रमाची सुरवात करण्यात येणार आहे. त्यानंतर निगडी येथील कामायनी शाळा, श्रमिकनगर येथील उर्दू शाळा, शाहूनगर येथील महात्मा फुले शाळा, मोहननगर येथील अंध शाळा, चिंचवड येथील चापेकर गुरुकुल विद्यालय, भोसरीतील यशवंतराव अनुसुचित अनाथाश्रम येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथील रुग्णांना, आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील संत मौनीबाबा वृद्धाश्रम आणि आळंदी येथील कुष्ठरोगी आनंदाश्रम या ठिकाणी फळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या संयोजक वेणू साबळे म्हणाल्या की, खासदार अमर साबळे यांची नाळ समाजातील दुर्लक्षित व पीडित लोकांशी जुळलेली आहे. त्यांच्या मनात असलेली या शोषित आणि पीडित समाजविषयीची तळमळ समजून घेत आम्ही त्यांचा वाढदिवस समाजातील अशाच घटकांबरोबर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक माऊली थोरात, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेवक केशव घोळवे,भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोळक, शहर भाजपा उपाध्यक्ष विजय शिनकर, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुभाष सरोदे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group