पिंपरी (Pclive7.com):- सोनसाखळी चोरी करणाऱ्या तीन जणांच्या इराणी टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दहा गुन्हे उघडकिस आले असून पोलिसांनी साडेतेरा लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे
हैदर अक्रम जाफरी (वय २८), जोहेब कदीररूल हसन सय्यद (वय ३१), जसिमुद्दीन हयातअली शेख (वय २०, तिघे रा.अंबवली, जि. ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही संशयित व्यक्ती कस्पटेवस्ती वाकड येथे थांबले असल्याची माहिती बातमीदारामार्फत पोलीस हवालदार जावेद पठाण यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी १० गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून १३ लाख ५३ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तीनही आरोपी मोटार भाड्याने घेऊन शहरात येत असत. त्यानंतर शहरात उभ्या केलेल्या दुचाकीवरून पिंपरी चिंचवड शहरात मंगळसूत्र चोरीचे गुन्हे करीत असत.
पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम पाटील, वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक निरीक्षक दत्तासाहेब लोंढे, उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस हवालदार जावेद पठाण, विवेकानंद सपकाळे, धनराज किरनाळे, शाम बाबा, नितीन गेंगजे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.






















Join Our Whatsapp Group