शिरूर (Pclive7.com):- शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.१३) मतदान सुरू आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात ४.९७ टक्के मतदान झाले. तर अकरा वाजेपर्यंत ही टक्केवारी वाढून १४.५१ टक्के एवढी झाली होती. तर दुपारी १ वाजेपर्यंत येथे २०.८९ टक्के एवढे मतदान झाले आहे.
विधानसभा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत झालेले मतदान टक्केवारी..
जुन्नर 19.76 टक्के
आंबेगाव 19.99 टक्के
खेड 23.6 टक्के
शिरूर 15.27 टक्के
भोसरी 24.27 टक्के
हडपसर 21.37 टक्के
जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. त्यामध्ये हडपसर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक पाच लाख 81 हजार 904 मतदार आहेत. त्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघात पाच लाख 51 हजार 582 मतदार आहेत. शिरूर विधानसभा मतदारसंघात चार लाख 39 हजार 276 मतदार आहेत. खेड आळंदी मध्ये तीन लाख 52 हजार 634, आंबेगाव मध्ये तीन लाख 2 हजार 101 तर जुन्नर विधानसभा मतदार संघात तीन लाख 12 हजार 205 मतदार आहेत.
मतदान टक्केवारी..
सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण – 4.97 टक्के
सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण – 14.51 टक्के
दुपारी एक वाजेपर्यंत एकूण – 20.89 टक्के
























Join Our Whatsapp Group