पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा ५ हजार २३५ कोटी २३ लाख रुपयांचा केंद्र सरकारच्या निधीसह अर्थसंकल्प स्थायी समिती सभेपुढे सादर केला. महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी राजेश लांडे यांनी हा अर्थसंकल्प स्थायी सभापती सीमा सावळे यांच्याकडे सादर केला. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे हे ३६ वे अंदाजपत्रक आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ५८५ कोेटी ७२ लाख (शिलकेसह) रक्कम जमा होईल. तसेच २०१८-१९ या वर्षात ३५०६ कोटी ६२ लाख उत्पन्न अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या पुरस्कृत योजनांच्या निधीसह ५ हजार २३५ कोटी २३ लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
अदांजपत्रकातील खास वैशिष्ट्ये
* महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या विकासकामांसाठी ७३७ कोटी ५४ लाखांची भरीव तरतूद करण्यात आलीय.
* शहरी गरिबांसाठी ९२८ कोटी ८९ लाखांची तरतूद
* जेंडर बजेट-महिलांच्या विविध योजनांसाठी ३३ कोटींची भरीव तरतूद
* महापौर विकास निधीसाठी ५ कोटींची तरतूद
* अपंग कल्याणकारी योजना २० कोटी
* मेट्रो विकास आराखड्यासाठी ५० कोटी तरतूद
* पाणी पुरवठा विशेषनिधी २३ कोटी
* पीएमपीएमएल करीता १६४ कोटी ५६ लाख तरतूद
* स्मार्ट सिटीसाठी १०० कोटी तरतूद
* अमृत योजनेसाठी ५९ कोटी ६३ लाख तरतूद
* पंतप्रधान आवास योजना ९२ कोटी ४५ लाख तरतूद
* स्वच्छ भारत मिशनसाठी २८ कोटी तरतूद
* नगररचना भू-संपादनाकरिता १४० कोटी तरतूद






















Join Our Whatsapp Group