पिंपरी (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा स्वाभिमान आहेत. भारतीय जनता पक्षासाठी महाराजांचे स्थान नेहमीच पूजनीय आहे. श्रीपाद छिंदम याने केलेले विधान आक्षेपार्ह असून त्या विधानाचा आणि भारतीय जनता पक्षाचा संबंध जोडणे बालिशपणाचे आहे. पक्षाने छिंदमला पदावरून बडतर्फ करीत पक्षातून तात्काळ बेदखल केले आहे, अशी वृत्ती समाजाला व पक्षाला घातक असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार साबळे यांनी केली.
अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. छिंदम हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे विरोधकांनी पक्षावर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर खासदार साबळे यांनी पक्षाच्यावतीने आपली भूमिका मांडली.






















Join Our Whatsapp Group