पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड परिसरातील काही भागांमध्ये ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारी अचानक मुसळधार पावसाने शहरातील काही भागांमध्ये हजेरी लावली. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. अखेर ढगांच्या गडगडाटासह दुपारी जोरदार पाऊस बरसला. चिंचवडमध्ये काही मिनिटांतच ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
शहरातील काही भागांमध्ये दुपारी साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. यामध्ये पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, चिखली आणि मोशी अशा काही परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पिंपरी विधानसभेतील झोपडपट्टी परिसरातील अनेक घरात पाणी शिरले होते. यावर्षी पहिल्यांदाच ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली.
एका तासाच्या आत तब्बल ११४ मिलिमीटर पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. तसेच काही रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी पाहायला मिळालं. यामुळे शहरात महापालिकेने नालेसफाई केले नसल्याचे बिंग फुटल्याचं बोललं जात आहे. नालेसफाई न झाल्याने काही भागांमध्ये घरात पाणी शिरल्याचं बघायला मिळाले.























Join Our Whatsapp Group