पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन दि.१ ते ५ ऑगस्ट या कालावधीत भक्ती शक्ती चौक, निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक येथे करण्यात येते. शहरातील सामाजिक संस्था,विविध शैक्षणिक व इतर संस्था, ट्रस्ट, कामगार संघटना, व्यक्ती कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.
पिंपरी चिंचवड शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व आयोजित करणेबाबत तसेच आयोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व पोलिस प्रशासन, महापालिका अधिकारी आदी सर्वांची एक समन्वय बैठक बुधवार, दि.१० जुलै २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे उप आयुक्त,माहिती व जनसंपर्क विभाग यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीस संबंधित मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.