पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे व किरण मोटे यांनी आज मुंबई मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर उपस्थितीत होते.
जितेंद्र ननवरे १० वर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक म्हणुन कार्यरत होते. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत तिकीट नाकारल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नीला भाजपची उमेदवारी संत तुकाराम नगर – कासारवाडी या प्रभागातुन मिळाली होती. तसेच किरण मोटे हे कासारवाडी प्रभागातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक म्हणुन २०१२ च्या निवडणुकीत निवडुण आले होते. त्यांनी देखील आज खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.






















Join Our Whatsapp Group