पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथे भक्ती शक्ती चौकात एका कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला. दोन दिवसांपूर्वी तरुणाचा खून झाला असल्याचा पोलिसांना संशय असून राहुल खुळे रा. सेक्टर २७ असे मृताचे नाव आहे.
आज दुपारी ११ वाजता निगडी चौक येथे कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. मृताची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे असून राहुल खुळे हा सेक्टर २७ असे मृत तरूणाचे नाव आहे. या तरूणाचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून तो शनिवार दि.३ पासून बेपत्ता होता. निगडी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group