चिंचवड (Pclive7.com):- टाटा मोटर्स कामगार युनियनचे माजी अध्यक्ष शिवाजीराव शेडगे (वय ६९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले आहे.

शिवाजीराव शेडगे हे टाटा मोटर्स कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष होते. तसेच पतीत पावन संघटनेचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले होते. भाजप नेते व उद्योजक शिवाजीराव शेडगे यांचे आज दि.०७ ॲागस्ट २०२४ रोजी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व मुलगी, सुना, नातवंडे तसेच जेष्ठ नेते पै. ज्ञानेश्वर शेडगे हे भाऊ व पुतणे माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे आणि एक बहिण असा परिवार आहे.
आज (दि.०७) रोजी दुपारी १२ वाजता काळेवाडी स्मशान भूमी या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.























Join Our Whatsapp Group