पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरासह पवना धरण क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पवना धरण सद्यस्थितीत ९९ टक्के भरलेले असून पाणलोट क्षेत्रात पावसास सुरुवात झालेली असल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज दि.२३ रात्री ११.३० वाजता जलविद्युत केंद्रामधून विद्युतगृहाद्वारे १४०० cusecs इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पवना नदी पात्रामध्ये एकुण १४०० cusec इतक्या क्षमतेने विसर्ग होणार आहे. पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल. तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.
सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास/प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group