पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पूर्णानगर येथे धारधार हत्याराने गळा चिरून विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. हा प्रकार मगंळवारी पहाटे दीडच्या सुमारास घडला.
वेदांत भोसले (२२, रा. पूर्णानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पहाटे दिडच्या सुमारास त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोर आणि कारण अद्याप स्पष्ट झाले नसून निगडी पोलिस शोध घेत आहेत. जखमी वेदांत याला नागरिकांनी रुग्णालयात दखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वेदांत हा निगडीतील माता अमृता शाळेत दहावीमध्ये शिकत होता.






















Join Our Whatsapp Group