पिंपरी (Pclive7.com):- आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, महाराष्ट्राची पहिली जॉइंट कमिशन इंटरनँशनल (जेसीआय), अमेरिका आणि एनएबीएचएक्रीडीटेड हॉस्पिटल यांनी १९ आणि २० फेब्रुवारी रोजी २ यशस्वी अवयवांचे प्रत्यारोपण केले आहे. आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पुणे आणि ग्लोबल हॉस्पिटल येथील डॉक्टर्सच्या संयुक्त टीमने पुनर्प्राप्ती आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पाडली.
आजारी असलेले दाते या दोघीही अनुक्रमे वय ४२ आणि ४६ वर्ष या पुण्यातील गृहिणी होत्या ज्यांना मोठ्या प्रमाणावर मेंदूत रक्तस्त्राव होऊन मेंदूतील स्टेम पेशींचे कार्य थांबून मृत्यू आला. दीर्घ समुपदेशन केल्यानंतर दोन्हीही कुटुंब परिस्थितीला समजू शकली आणि त्यांनी अवयव दानाची इच्छा व्यक्त केली. या उदात्त हेतूमुळे यकृताचा गंभीर आजर आणि किडनीचा शेवटच्या स्तरावरील आजार असलेल्या गरजू रुग्णांसाठी दोन यकृत आणि चार किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी उपलब्ध अन्यथा त्यांचा आजार बळावला असता.
आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये ज्यांना यकृत लाभले त्या ५४ वर्षाच्या सांगलीच्या गृहिणी होत्या तर दुसरे ६० वर्षाचे मुंबईतील पुरुष होते. दुसरीकडे किडनीचा लाभ २० वर्षाच्या विद्यार्थिनी असलेल्या मुलीला आणि ३७ वर्षाच्या आयटी व्यावसायिकाला झाला. एक किडनी नाशिकच्या हॉस्पिटलला तर दुसरी पुण्यातल्या हॉस्पिटलला देण्यात आली. हे सर्व वाटप विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) सल्ल्याने करण्यात आले.
आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे म्हणाल्या की “मेंदू मृत झालेल्या रुग्णांकडून दान केलेले अवयव प्राप्त करणे हे लोकांमध्ये झालेल्या व्यापक जनजागृती आणि आदित्य बिर्ला क्रिटीकल केअर टीमच्या सदस्यांनी प्रभावित कुटुंबाच्या केलेल्या सखोल समुपदेशन यामुळे शक्य झाले. “जानेवारी २०१६ पासून हॉस्पिटलमध्ये संभावित दात्यांच्या कुटुंबियांचे योग्य समुपदेशन झाल्याने पाच मृत व्यक्तींचे अवयव दान बघायला मिळाले आहे.परिणामस्वरूप सहा यकृत, आठ किडनी आणि एक हृदय प्राप्त होऊ शकेल. अलीकडे बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलला यकृत प्रत्यारोपणासाठी मान्यता मिळाली आहे आणि हॉस्पिटल दान केलेले अवयव प्राप्त करणे आणि प्रत्यारोपण या दोन्ही गोष्टी अविरतपणे करत राहील.”. आदित्य बिर्ला हॉस्पिटलला अवयव प्राप्त करणे आणि किडनी प्रत्यारोपण यसाठी २००७ पासून मान्यता आहे आणि अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमात ते अग्रभागी आहे.






















Join Our Whatsapp Group