पिंपरी (Pclive7.com):- टाटा मोटर्सच्या ट्रेनिंग डिव्हिजन हॉलमध्ये औद्योगिक क्रीडा संघटनेच्या टाटा मोटर्स पिंपरीच्या वतीने घेण्यात येणारी ६१ वी वेटलिफ्टिंग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये एकूण ३४ खेळाडूंनी भाग घेतला. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो चाकण, मशिनिस्ट टेक्नॉलॉजी, एमक्यूअर, थरमॅक्स, भाविषा इंटरप्राईजेस, डीएस डब्ल्यू वेहिकल्स, सँडविक, एचइ एफ, त्रिगोन, मेवरिक, एसकेएफ या कंपन्यांच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धा एकूण दहा गटांमध्ये झाल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन अतुल अहिरे (डीजीएम -एचआर) व शिशुपाल तोमर (टाटा मोटर्स युनियन -अध्यक्ष) यांनी केले. याप्रसंगी बोलताना अतुल अहिरे म्हणाले की, स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंना माझ्या शुभेच्छा, त्यांनी उत्तम कामगिरी करावी ही इच्छा. तर शिशुपाल तोमर (टाटा मोटर्स युनियन अध्यक्ष) म्हणाले “औद्योगिक क्रीडा संघटनेच्या स्पर्धेमुळे अनेक खेळाडू उदयास येत आहेत व हे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. याप्रसंगी प्रास्ताविक प्रदिप वाघ यांनी केले. आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच प्रशांत बेंद्रे यांनी सर्व खेळाडूंना खेळाचे नियम समजावून यावेळी प्रवीण तांबे (एचआर मॅनेजर, टाटा मोटर्स), शशिकांत कात्रे (युनियन स्पोर्ट्स कमिटी, चेअरमन), युनियन प्रतिनिधी औदुंबर गणेशकर, विलास सपकाळ, विक्रम वर्पे, विनोद कुरंगळे, अबीद सय्यद, दत्ता गायकवाड (एच आर मॅनेजर- महेंद्र अँड महेंद्र) प्रवीण कांबळे (जेसीबी) हे उपस्थित होते.

या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन किशोर मुसळे, प्रशांत बेंद्रे, नारायण औटी, उत्तम भोसले, निलेश महाजन यांनी केले व या स्पर्धेचे पंच म्हणून महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटना यांचे माजी सेक्रेटरी प्रमोद चोलकर व पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटना सहखजिनदार अनंत साने यांनी काम पाहिले. यात उल्लेखनीय बाब म्हणजे यावर्षी टाटा मोटर्सचे प्रशांत बेंद्रे यांनी नुकत्याच झालेल्या पेरू देशातील वेटलिफ्टिंगच्या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहिले. तसेच आजपर्यंत १० खेलो -इंडिया स्पर्धेसाठी व ३ इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी पंच म्हणून काम पाहिलेले आहे व वेट लिफ्टिंग कॉम्पिटिशन मॅनेजमेंट साठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ही केलेली आहे. यावेळी औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम, स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे व खजिनदार प्रदिप वाघ हे उपस्थित होते.
स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे..
१)५५किलो गट:- १)सतीश बेदर(टाटा मोटर्स)९५ किलो.२) देवेश वाघ (टाटा मोटर्स)७५ किलो
२)६१ किलो गट:-१) मनीष गजमल (भाविषा एंटरप्राईजेस) १९५ किलो २)शाकिब मुजावर(टाटा मोटर्स) १२५ किलो ३)संकेत पेरवी(टाटा मोटर्स)१०७ किलो
३)६७किलो गट:–१) मनोज थोरात (महेंद्रा अँड महिंद्रा) १११ किलो २)विशाल तांदळे(एच इ एफ) ११० किलो ३)सागर सदाकाळ( टाटा मोटर्स) ९५ किलो
४)७३ किलो गट :-१)अमोल मोर्डे (टाटा मोटर्स) १९२ किलो २)किशोर मुसळे (टाटा मोटर्स) १२० किलो ३)सदानंद टेपूगडे १०५किलो (टाटा मोटर्स)
५)८१ किलो गट :-१)नितीन जाधव(मशिनीस्ट टेक्नॉलॉजी) १४५ किलो२) विक्रम खरात (टाटा मोटर्स) १३८ किलो ३)किशोर धोत्रे ( महिंद्रा अँड महिंद्रा) १३७ किलो
६)८९ किलो गट :-१)स्वप्निल जवळकर (सँडविक एशिया) १६०किलो २)दादासो चव्हाण (टाटा मोटर्स) १४६ किलो ३)शुभम मोहिते (टाटा मोटर्स) १२५किलो
७)९६ किलो गट :-१)विशाल साळगावकर( एमक्यूअर)१४५ किलो २)अतुल ओव्हाळ (महिंद्रा अँड महिंद्रा)१३५ किलो ३) निखिल होगळे( महिंद्रा अँड महिंद्रा )१३० किलो
८)१०२ किलो गट :-१)यशवंत कांबिरे (टाटा मोटर्स ) १४५ किलो २)राजेंद्र बुरकुले (महेंद्र अँड महेंद्रा)११० किलो
९)१०९ किलो गट:- १)अक्षय दरे( मॅवरिक)१२५किलो
१०)१०९ किलो वर :-१)शेखर रावडे (टाटा मोटर्स) १०५ किलो
यावर्षीचा बेस्ट वेटलिफ्टर मनीष गजमल (भाविषा एंटरप्राईज)१९६.९९ किलो
वेट लिफ्टिंग स्पर्धेमधील विजेतेपद टाटा मोटर्स यांनी ३८ गुण मिळवून तर उपविजेतेपद महेंद्र अँड महिंद्रा १३ गुण यांनी मिळवून पटकाविले.
यावर्षीचा बेस्ट वेटलिफ्टर मनीष गजमल भावेश इंटरप्राईजेस हा ठरला.






















Join Our Whatsapp Group