पिंपरी (Pclive7.com):- औद्योगिक क्रीडा संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ६१ व्या बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ झाला. ही स्पर्धा फोरविया फॉरेशिया कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये मॅक्सीऑन व्हील्स, अम्पिर कम्प्युटिंग, क्रोपनस्का इंडिया, आयईसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह, टाटा मोटर्स, अमुनिशन फॅक्टरी, टीकेआयएल इंडस्ट्रीज, फाईन स्पार्क, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो आकुर्डी, थरमॅक्स बॅबकॉक, फॉर्विया, बीसीसीएल टाइम्स ऑफ इंडिया, इंडप्रो इंजिनिरिंग, एचयू एफ इंडिया, एसकेएफ, सॅडविक इंडिया, जेसीबी इंडिया, बॉश चासिस इंडिया, अप्लस इडिदा, स्कोडा ऑटो, कमिन्स इंडिया, अभिषेक एंटरप्रिझेस वगैरे २४ कंपन्यांच्या एकूण १०३ खेळाडूंनी भाग घेतलेला आहे. यावर्षी औद्योगिक क्रीडा संघटनेच्या बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. ही स्पर्धा दोन दिवस चालेल.

आज स्पर्धेच्या सुरुवातीला प्रास्ताविक औद्योगिक क्रीडा संघटनेचे प्रदीप वाघ यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रज्ञा पगार (फोरविया फॉरेशिया) यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन फोरविया फोरेशिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्रशांत चौधरी (एफआयएस डायरेक्टर) व जितेंद्र निखळ (अँडमिन हेड) यांनी केले.
उद्घाटन प्रसंगी प्रशांत चौधरी म्हणाले की, यावर्षी स्पर्धेसाठी मिळालेला प्रतिसाद उत्तम आहे पण यापेक्षाही जास्त स्पर्धकांची अपेक्षा आहे. तणावातून बाहेर पडण्यासाठी बुद्धिबळ या खेळाचा उपयोग फारच चांगला होतो. तर जितेंद्र निखळ म्हणाले की, या खेळामध्ये बुद्धीचा कस लागतो व संकटातून बाहेर कसे पडावे याचाही मार्ग मिळतो. याप्रसंगी संदीप चौगुले (एचआर,मॅनेजर), प्रीती कुलकर्णी (एडमिन, फोरविया फॉरेशिया), दुष्यंत गायकवाड (सॅडविक इंडिया स्पोर्ट्स कमिटी), राहुल कापसे (प्राज इंडस्ट्रीज स्पोर्ट्स कमिटी), संतोष शिंदे (एसकेएफ स्पोर्ट्स कमिटी), सचिन कांबळे (जेसीबी स्पोर्ट्स कमिटी), दत्ता गायकवाड (एचआर मॅनेजर,महिंद्रा अँड महिंद्रा), दिनेश भुजबळ, श्रीनिवास मोरे हे उपस्थित होते. सदर स्पर्धेला टॅक्टीकल मुव्हज चेस अकॅडमी टीमचे आदेश इंगळे, शार्दुल तपासे (इंटरनॅशनल ऑर्बिटर) यांचे साह्य व आयोजन लाभलेले आहे. या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन अनिकेत आवटे, प्रकाश अडकणे, प्रणित गवांदगवे,केयूर शहा, सिद्धेश गाडगे, दत्ता पाटील, प्रज्ञा पगार यांनी केले आहे. औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम, खजिनदार प्रदीप वाघ, स्पर्धाप्रमुख हरी देशपांडे हे उपस्थित होते.
या स्पर्धेचे प्राथमिक फेरीचे निकाल खालील प्रमाणे..
१) डॉक्टर रामचंद्रन विजय नारायण(मॅक्सीऑन व्हील्स) विजयी विरुद्ध कृष्णात माने(मॅक्सीऑन व्हील्स)(1-0)
२) महेंद्र देवरे(महिंद्रा अँड महिंद्रा)पराभूत विरुद्ध श्लेषा मडकईकर(अम्पिर कम्प्युटिंग)(0-1)
३) श्रीकांत मुचंडीकर(क्रोपनस्का इंडिया) विजयी विरुद्ध महेश काळे(सॅडविक इंडिया)(1-0)
४) महेश खुडे(सॅडविक इंडिया)पराभूत विरुद्ध अनुराग देशमुख (आयईसी इंटरनॅशनल)(0-1)
५) प्रसाद चितारे (टाटा मोटर्स )विजयी विरुद्ध मथियाजगन पी (थरमॅक्स बॅबकॉक)(1-0)
दुसऱ्या फेरीचे काही निकाल खालील प्रमाणे आहेत
१) दुष्यंत गायकवाड(सॅडविक इंडिया)पराभूत विरुद्ध डॉक्टर रामचंद्रन विजय नारायण(मॅक्सीऑन व्हील्स)(0-1)
२) श्लेषा मडकाईकर(अम्पिर कम्प्युटिंग)विजयी विरुद्ध ज्ञानेश भुते(टीकेआयएल इंडस्ट्रीज)(1-0)
३) गणेशन सी (अमुनिशन फॅक्टरी) पराभूत विरुद्ध श्रीकांत मुचंडीकर(क्रोपनस्का इंडिया)(0-1)
४) अनुराग देशमुख (आयईसी इंटरनॅशनल)विजयी विरुद्ध गुंजन पालीवाल(बजाज ऑटो आकुर्डी)(1-0)
५) कल्याणी खडके(फोरविया) पराभूत विरुद्ध प्रसाद चितारे(टाटा मोटर्स)(0-1)






















Join Our Whatsapp Group