भोसरी (Pclive7.com):- विजयादशमीनिमित्त त्रिवेणीनगर येथील त्रिवेणी मित्र मंडळाने महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हचे दहन केले. खोट्या प्रचाराच्या रावणाचे दहन केले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
माजी नगरसेविका अरुणा भालेकर यांच्या पुढाकाराने रावण दहन करण्यात आले. भोसरी मतदारसंघात झालेला विकास डोळ्यावर पट्टी बांधलेल्या विरोधकांना दिसत नाही. विरोधकांकडे सांगण्यासारखे काहीच नाही. लोकांसमोर कोणत्या तोंडाने मते मागण्यासाठी जावे याच्या विचारत विरोधक आहेत. सत्तेत असताना कोणतेही कामे केली नाहीत. आता भोसरी मतदारसंघात झालेला विकास दिसत नाही. त्यात आडकाठी घालणे, फेक नरेटिव्ह पसरून बदनामी करण्याचा महाविकास आघाडीचा एककलमी कारभार सूरु आहे. या खोट्या नरेटिव्हच्या रावणाचे दहन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, महादेव कवितके, अजय पाताडे , विजय घोडके, बाळासाहेब गंगावणे, सुहास ताम्हाणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन निलेश भालेकर यांनी केले होते. सूत्रसंचालन मनोज भालेकर यांनी केले.
पुरावे नाहीत, नुसतेच आरोप – अरुणा भालेकर
२०० कोटी रुपयांचे लंडनमध्ये हॉटेल, अर्बन स्ट्रीटमध्ये ३५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, राज्य शासनाकडून एकही प्रकल्प नाही, संतपीठ उभारण्यामध्ये घोटाळा, भामा आसखेडचे पाणी आले नाही, इंद्रायणी नदीच्या कामात १४०० कोटी रुपयांचा घोटाळा, शहराच्या अस्मितेला डाग लागला, हुकूमशाही, दडपशाही, गुंडगिरी, अनधिकृत बांधकामे, भोसरी विधानसभेची अधोगती या फेक नरेटिव्हच्या रावणाचे दहन करण्यात आले. विरोधकांकडून मोघम आरोप केले जात आहेत. कोणतेही पुरावे दिले जात नाहीत. एकही आरोप सिद्ध करता न आल्याने फेक नरेटिव्ह पसरविण्याचे काम केले जात आहेत, अशी माहिती माजी नगरसेविका अरुणा भालेकर यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group